मुंबई : राष्ट्रपती निवडणूक २०२२ च्या अनुषंगाने भारत निवडणूक आयोगाकडून नियुक्त निवडणूक निरीक्षक तथा केंद्र शासनाचे अतिरिक्त सचिव अमित अग्रवाल यांनी आज विधानभवनातील सेंट्रल हॉल येथे स्थापन करण्यात आलेल्या मतदान केंद्राला भेट देऊन पाहणी केली आणि निवडणूक तयारीची माहिती घेतली.
दरम्यान, यावेळी विधानभवनातील सेंट्रल हॉलमध्ये मतदान होणार आहे. यासंदर्भात नियोजन प्रक्रिया पार पडली.