मुबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारयांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. पवार यांनीच ट्विटरवरून ही माहिती दिली. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार उपचार घेत असून काळजीचे कोणतेही कारण नसल्याचेही त्यांनी म्हटलं आहे. मागील काही दिवसांत संपर्कात आलेल्यांनी खबरदारी घेण्याचे आवाहन पवार यांनी केलं आहे.
दरम्यान, राज्यात रविवारी 40 हजार 805 नवे रुग्ण आढळून आले. तर 27 हजार 377 रुग्ण बरे होऊन घरी गेले. रविवारपर्यंत एकूण 70 लाख 67 हजार 955 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 94.15 टक्के एवढे झाले आहे. रविवारपर्यंत तपासण्यात आलेल्या ७ कोटी 33 लाख 69 हजार 912 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 75 लाख 7 हजार 225 नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.