मुंबई-अहमदाबाद मार्गावरील प्रस्तावित बुलेट ट्रेन प्रकल्पाचे काम जलद करण्यासाठी भारतीय रेल्वे सज्ज झाली आहे. या ५०८ किलोमीटर लांबीच्या मार्गावर हायस्पीड रेल कॉरिडॉरवर पुलांच्या बांधकामासाठी विशेषतः डिझाइन केलेले एक महाकाय मशीन रेल्वेने यशस्वीरित्या लॉन्च केले आहे. मुंबई-अहमदाबाद हाय स्पीड रेल प्रोजेक्ट (MAHSR) अंतर्गत, हे महाकाय मशीन रेल्वे कॉरिडॉरवर जलद पुलांच्या बांधकामात वापरले जाईल.
दरम्यान,हे मशीन फुल स्पॅन लॉन्चिंग मेथडॉलॉजी (FSLM) वर काम करते, जे इतर तंत्रज्ञानापेक्षा खूप वेगवान आहे. हेच कारण आहे की आजकाल हे तंत्रज्ञान जगभरात वापरले जात आहे. याच्या मदतीने दुहेरी ट्रॅकवर पूल बांधण्याचे गर्डर एकाच वेळी पूर्ण केले जातील. त्यानंतर त्यांना लॉन्च करण्याच्या कामाला वेग येईल. यासह, भारत आता इटली, नॉर्वे, कोरिया आणि चीनसारख्या निवडक देशांमध्ये सामील झाला आहे जे अशा मशीनची रचना आणि निर्मिती करत आहेत.