देशातल्या लठ्ठ लोकांना वजन घटविण्यास प्रोत्साहित करण्यासाठी संयुक्त अरब अमिरात (UAE) सरकार ‘लूज टू विन’ कार्यक्रम राबववित आहे. कार्यक्रमाच्या यावर्षीच्या आवृत्तीत पायाभूत विकास मंत्रालयाच्या कर्मचार्यांना वजन घटविण्यास मार्गदर्शन दिले जात आहे.
आठ आठवड्यांच्या काळात त्यांना पोषक आहाराचा अवलंब करण्यास आणि शारीरिक व्यायाम करण्यासाठी मार्गदर्शन केले जाणार.
हा एक अरबी द्वीपकल्प देश आहे जो प्रामुख्याने पारशी (अरब) आखाती प्रदेश आहे. हा देश 7 अमिरातीचा महासंघ आहे. अबू धाबी ही या देशाची राजधानी आहे आणि ‘यूएई दिरहम’ हे राष्ट्रीय चलन आहे.