वरुण धवन करतोय ‘या’ साऊथ फिल्मच्या हिंदी रिमेकची तयारी

सध्या बॉलिवूडमध्ये साऊथ इंडियन फिल्मच्या हिंदी रिमेकचा ट्रेन्ड सुरु आहे. ‘कबीर सिंग’पासून ते अक्षय कुमारच्या ‘बच्चन पांडे’पर्यंत अनेक बॉलिवूड चित्रपट हे साऊथ चित्रपटांचे हिंदी रिमेक आहेत. आता या यादीत आणखी एका नावाची भर पडणार आहे. कारण अभिनेता वरुण धवन साऊथ फिल्मच्या हिंदी रिमेकची तयारी करत आहे. यासाठी वरूणने साऊथचा प्रसिद्ध डायरेक्टर ऍटलीसोबत बोलणी सुरु केली आहेत.

वरुण आणि ऍटली एका थ्रिलर चित्रपटात एकत्र काम करणार आहेत. ऍटली वरुण धवनसोबत त्यांचा साऊथ चित्रपट थेरीचा हिंदी रिमेक बनवणार आहेत. ऍटली यांनी हा चित्रपट २०१६ मध्ये बनवला होता. यात साऊथचा सुपरस्टार विजय दवरकोंडा आणि समंथा रुथ प्रभू यांनी काम केले होते. याच्या हिंदी रिमेकबाबात कोणताही अधिकृत घोषणा झालेली नाही. मात्र सध्या ऍटली यांच्या चित्रपटाच्या हिंदी रिमेकबाबत बॉलिवूडमध्ये विशेष चर्चा आहे. ऍटली यांच्या आवडीच्या कलाकारांच्या शर्यतीत वरूण धवन आघाडीवर आहे. नुकतीच दोघांनी एकमेकांची भेट घेतली. या भेटीदरम्यान दोघांमध्ये साऊथ चित्रपटाच्या हिंदी रिमेक करण्यावर चर्चा झाल्याचे बोलले जात आहे.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.