वाशीम : विदर्भात खरीप हंगाम संपल्यानंतर उन्हाळ्यात मजुरांच्या हाताला काहीच काम उरत नाही,एकदे वेळी उपासमारीची वेळ देखील येते काही लोक रोजगारासाठी पुणे, मुंबई सारखी शहरे गाठतात पण उन्हाळ्यात आप्त स्वकीयांचे लग्न असल्याने पुणे मुंबई येथून रोजगार सोडून गावात येणे परवडणारे नसते. अश्यावेळी किफायतशीर उघोग म्हणून तेंदू पत्ता उघोगाकडे पाहीले जाते.तेंदुपत्त्यापासून धुम्रपान साठी लागणारी विडी बनविले जाते.धुम्रपान तसेच आरोग्यासाठी हानिकारकच परंतू या उघोगापासून शासनास मोठ्या प्रमाणावर महसुली मिळत असल्याने यावर बंदी घालण्यास शासन धजावत नाही.धुम्रपान आरोग्य हानीकारक असले तरी मंजुराच्या हाताला काम मिळते असते म्हणून आदीवासी,भटके, विमुक्त जातीतील लोक मोठ्या प्रमाणावर तेंदूपत्ता तोडण्याचे काम करीत असतात
दरम्यान, भल्या पहाटे ४ वाजता उठुन तेंदु तोडण्यास जाने आणि दुपारपर्यंत तेंदूची(टेंभुर्णी)पाने घरी घेऊन येऊन त्याला व्यवस्थित जोडून त्याचा सत्तर,ऐंशी पानांचा मुडा बनवून सायंकाळी तेंदुपत्ता ठेकेदारांच्या फडावर नेऊन जमा करतात शेकडा अडीचशे रुपये प्रमाणे ठेकेदार तेंदूपत्ता मजुराला चुकते करतो.एक कुटुंब साधायचे एके दिवशी पाचशे ते सहाशे मुडे बनवून ठेकेदाराला विकतो. या व्यवसायात किफायतशीर पैसा मिळत असला तरी जंगली हिंस्त्र पशु केलेल्या हल्यात अनेक मजूरांनी प्राण देखील गामावल्याची उदाहरणे आहेत.
एकेकाळी तेंदूपत्ता मजुर म्हणून तेंदुपत्ता तोडण्याचे काम केलेले मुंबई महापालिकेतील उच्च पदस्थ रितेश हरीष पवार यांनी सांगितले की,मी जरी सुखवस्तू घरातील जरी असलो तरी उन्हाळ्याच्या सुट्टीत माझ्या गावीआजी आजोबा कडे जात असल्याने तसेच तांड्यातील माझे सवंगडी तेंदुपत्ता मजुर म्हणून काम करत असल्याने मी देखील त्यांच्या समवेत तेंदूपत्ता तोडण्याचे काम केले आहे.त्यावेळी शंभर विस रुपये मिळायचे. त्या विस रुपयांचा मिळणारा आनंद गगनात मावेनासा होता.आज मुंबईत तिन हजार पटीने पैसा कमवत असलो तरी माझी त्या आनंदाची सर येऊ शकत नाही.
रितेश पवार, विशेष प्रतिनिधी