वैद्यकीय क्षेत्रातलं मोठं यश, एड्सवर सापडलं औषध

एचआय़व्ही, या नावानेच घाबरायला होतं, पण आता या जीवघेण्या एडस आजारावर औषध सापडलं आहे. वैद्यकीय क्षेत्राचं हे मोठं यश मानलं जातं आहे. पहिल्यांदाच एक महिला एडसमधून ठणठणीत बरीझालीय.अमेरिकेतल्या डॉक्टरांनी आणि संशोधकांनी एड्सवरचं औषध शोधलं आहे. स्टेमसेल ट्रान्सप्लांटच्या माध्यमातून एड्सबाधित महिलेवर उपचार करण्यात आले. ज्या व्यक्तीमध्ये HIV विरोधात नैसर्गिक प्रतिकारशक्ती होती, अशा व्यक्तीनं या स्टेमसेल्स दान केल्या. या ट्रान्सप्लांटमध्ये अंबिलिकल कॉर्डमधल्या रक्ताचा वापर करण्यात आला.

दरम्यान 2013 मध्ये या महिलेला एड्स झाला त्यानंतर चार वर्षांनी तिला ल्यूकेमिया झाला. 2017 मध्ये महिलेवर ट्रान्सप्लांटचे उपचार सुरू झाले. ट्रान्सप्लांटनंतर आता ही महिला ठणठणीत बरी झाली आहे. तिच्यावरचे एड्सचे सगळे उपचार आता थांबवण्यात आले आहेत.याआधी जगात एड्समधून बरे झालेले फक्त दोन रुग्ण आहेत. त्या दोघांना विविध औषधांच्या माध्यमातून बरं करण्यात आलं. अमेरिकेतली ही महिला एडस, ल्युकेमियामधून ठणठणीत बरी झाली आहे. वैद्यकीय क्षेत्रातल्या या संशोधनामुळे जिंदगी मिलेगी दोबारावरचा विश्वास आणखी वाढला आहे

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.