शिवसेनेचे राज्यसभा सदस्य संजय राऊत यांनी म्हटले होते की, त्यांचा पक्ष पूर्ण शक्तीने बंदमध्ये सहभागी होईल. केंद्र सरकारने केलेल्या शेतकरी विरोधी कायद्यांविरोधात लोकांना जागृत करणे आवश्यक आहे, असेही ते म्हणाले होते. किसान सभेने या महाराष्ट्र बंदला पाठिंबा दिला आहे. संघटनेने म्हटले आहे की, २१ जिल्ह्यांतील त्याचे कार्यकर्ते बंद यशस्वी करण्यासाठी समविचारी संघटनांशी समन्वय साधत आहेत.
दरम्यान, केंद्रीय मंत्र्यांचे पुत्र आशिष मिश्रा यांना शनिवारी रात्री लखीमपूर खेरी येथील हिंसाचाराप्रकरणी पोलिसांनी अटक केली. यूपीचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांच्या कार्यक्रमाला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांना चिरडणाऱ्या वाहनांपैकी एकामध्ये बसल्याचा आरोप आशिषवर आहे. या अपघातात चार शेतकऱ्यांचा मृत्यू झाला होता.