शिवरायांनी सतत तीस वर्ष धडपड करून एक करोड होनांचे स्वतःचे राज्य निर्माण केले. ही एक जहागिरी नसून स्वतंत्र सार्वभौम राज्य आहे हे हिंदुस्थानातील सर्व राज्यकर्त्यांना कळावे म्हणून त्या राज्याचा हिंदुधर्माच्या वतीने इतरांना जाब विचारायचा अधिकार आहे हे सर्वांना कळून येते त्यांना जरब बसावी या हेतूने शिवरायांनी राज्याभिषेकाचा विधी यथासांग पार पाडायचे ठरविले.
राज्याभिषेकाचा मुहूर्त ५ जून रोजी उत्तररात्री होता. रायगडावर राज्याभिषेकाची धूमधडाक्याने तयारी सुरू झाली. शहाजी काशीचे महाविद्वान पंडित गागाभट्ट यांनी या सोहळ्याचे संचालन केले महा नद्यांचे पवित्र जल,सुलक्षणी हत्ती,घोडा,व्याग्र- मृग -चर्म, छत्र- चामरे, सुवर्ण कलश, सिंहासन अशा सर्व साहित्य निशी थाटामाटाने राज्याभिषेक सोहळा पार पडला. पहाटेच्यावेळी नवीन वस्त्रे परिधान करून शिवराय राज्यसभेत सिंहासनावर विराजमान झाले. गागाभट्टांनी छत्र घेऊन त्यांच्या मस्तकी धरली व जयघोष केला. ‘क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर श्रीमंत छत्रपती श्री शिवाजी महाराज…’ आणि शिवाजी महाराजांना राजा म्हणून इतरांची मान्यता मिळाली.