आयसीसी अर्थात आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने काल फेब्रुवारी महिन्यातील सर्वोत्तम खेळाडूची घोषणा केली. आयसीसीचा प्लेअर ऑफ द मन्थ हा पुरस्कार टीम इंडियाचा स्टार फलंदाज श्रेयस अय्यर याला मिळाला आहे. आयसीसीने ट्विटद्वारे ही माहिती दिली आहे. श्रेयसला त्याने फेब्रुवारी महिन्यात केलेल्या कामगिरीसाठी हा पुरस्कार मिळाला आहे.
या पुरस्कारासाठी एकूण 3 खेळाडूंना नामांकन देण्यात येतं. त्यानुसार आयसीसीने श्रेयस व्यतिरिक्त यूएईच्या वृत्य अरविंद आणि नेपाळच्या दीप्रेंद्र सिंग एरीला पुरुष गटातून नामांकन देण्यात आलं होतं. मात्र श्रेयसने या दोघांना पछाडत हा पुरस्कार मिळवला आहे.
दरम्यान श्रेयसला श्रीलंका विरुद्धच्या टी 20 मालिकेत केलेल्या शानदार कामगिरीसाठी हा पुरस्कार मिळाला आहे. श्रेयसने श्रीलंका विरुद्धच्या 3 सामन्यांच्या टी 20 मालिकेत सलग 3 नाबाद अर्धशतकं ठोकली होती. श्रेयसने या मालिकेत एकूण 204 धावा केल्या होत्या.