आपल्या राज्यात राज्य शासनाचे सुमारे १ लाख २० हजार कर्मचारी, अधिकारी आहेत. दरम्यान आता राज्यातील शासकीय कर्मचाऱ्यांसाठी मोबाइल वापराबाबत आचारसंहिता लागू करण्यात आली याबाबतचा शासन निर्णय सामान्य प्रशासन विभागाने जारी केला.
नव्या नियमावलीनुसार कार्यालयीन कामासाठी दूरध्वनीचा वापर करताना कार्यालयातील दूरध्वनी म्हणजे लँडलाईनचा वापर करावा.कार्यालयीन वेळेत कार्यालयीन कामासाठी आवश्यक असेल तेव्हाच भ्रमणध्वनीचा वापर करावा. कार्यालयीन कामासाठी मोबाईलचा वापर करताना टेक्स मेसेजचा वापर करावा.वैयक्तिक दूरध्वनी , हे कक्षाचे बाहेर जाऊन घ्यावेत. तसेच बोलताना इतरांच्या उपस्थितीची जाणीव ठेवावी.मोबाईल वर बोलताना सौम्य आवाजात बोलावे, बोलताना वाद घालू नये तसेच असंसदीय भाषेचा वापर करू नये.