नवी मुंबई: सुपरस्टार सलमान खानने पनवेल फार्महाऊसवर त्याच्या शेजारी राहणाऱ्या केतन कक्करविरोधात मानहानीचा दावा दाखल केला आहे. दबंग खानने त्याचा शेजारी केतनवर सलमानची मीडियात बदनामी केल्याचा आरोप केला आहे. 14 जानेवारी रोजी, सलमानच्या कायदेशीर टीमने सोशल नेटवर्किंग साइट्सवरील सर्व अपमानास्पद सामग्री काढून टाकण्याची किंवा ब्लॉक करण्याची मागणी केली.
दरम्यान, रिपोर्ट्सनुसार केतन कक्कर हा मुंबईतील मालाडचा रहिवासी आहे आणि पनवेलमध्ये सलमान खानच्या फार्महाऊसजवळ त्याची जमीन आहे. सलमानच्या वकिलानुसार, त्याचा शेजारी केतन याने एका यूट्यूबरला दिलेल्या मुलाखतीत सलमान खानची बदनामी केली. गुगल, यूट्यूब, ट्विटर आणि फेसबुक या सोशल मीडिया कंपन्यांना आणखी दोन जण या प्रकरणात पक्षकार करण्यात आले आहेत.