उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी साहित्यविश्वात प्रतिष्ठेचा मानला जाणारा ‘साहित्य अकादमी’ पुरस्कार नंदा खरे आणि आबा महाजन या मराठी साहित्यिकांना जाहीर झाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले आहे.
दरम्यान ,नंदा खरे यांच्या ‘उद्या’ या कादंबरीला तसेच बालसाहित्यासाठी आबा महाजन यांच्या ‘आबाची गोष्ट’ या पुस्तकाला जाहीर झाला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर झालेल्या अन्य वीस भाषांमधील साहित्यिकांचेही अभिनंदन केले आहे.