बॉलिवूडची अभिनेत्री सोनम कपूर आता लवकरच आई होणार आहे, ती तिच्या पहिल्या मुलाला जन्म देणार आहे. तिने तिच्या सोशल मिडिया अकाउंटवर तिचा पती आनंद आहूजा सोबत काही फोटो शेअर केले आहेत. ज्यामध्ये तिचं बेबी बंप स्पष्ट दिसत आहे. या फोटोंसोबत सोनमने तिच्या प्रेग्नेंसीची घोषणा सुद्धा केली आहे.
सोनम कपूर फोटो शेअर करत म्हणाली, “चार हात जे तुझा उत्तम सांभाळ करतील, दोन हृदय जे तुझ्यासोबत धडधडतील, एक कुटुंब जे तुला प्रेम आणि सपोर्ट करेल, आम्ही तुझ्या येण्याची वाट बघत आहोत”.
सोनम कपूरच्या या फोटोंवर बॉलिवूड कलाकारांनी भरभरून प्रेम व्यक्त केलं आहे. भूमि पेडनेकर ने हार्ट इमोजी सोबत सोनम आणि आनंदला शुभेच्छा दिल्या आहेत. एकता कपूर , जान्हवी कपूर , करीना कपूर , रविना टंडन , करिश्मा कपूर यांनी देखील सोनमला शुभेच्छा दिल्या आहेत.