गेल्या वर्षी स्थलांतरित लोकांच्या मदतीसाठी सोनू सूद धावून आला आणि आता संपूर्ण देशभरात त्याची पूजा केली जात आहे. स्थलांतरित लोकांनाच मदत करून सोनू थांबला नाही, त्याने स्वतःच्या घराला क्वारंटाईन सेंटर केले, मग लसीकरण मोहीम सुरू केली आणि त्यानंतर ऑक्सीजन पुरवठ्यासाठी मदत देखील सोनूने केली. इतकेच नव्हेतर या कठीण काळात चाहत्यांकडून सोनूने शेअर केलेल्या व्हिडिओंना खूप पसंती मिळाली आहे.
आता सोनू सूदचा एक नवा व्हिडिओ समोर आला आहे. ज्यामध्ये तो स्वतः तो सुपरमार्केट सुरू करताना दिसत आहे. सोनूच्या या मार्केटमध्ये जबरदस्त डिस्काउंट पण देण्यात आले आहे. सायकवर बसलेल्या सोनू सूदकडे सर्व काही आहे, ज्याची तुम्हाला गरज आहे. व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये सोनू म्हणत आहे की, ‘माझ्याकडे सर्व काही आहे. ६ रुपये अंडे, ४० रुपयांचा मोठा ब्रेड, २२ रुपयांचा छोटा ब्रेड, तसेच यासोबत पाव, बिस्कट आहे. तुम्ही लवकरात लवकर ऑर्डर करा. माझ्या डिलिव्हरीची वेळ झाली आहे. खूप महत्त्वाचे आहे आणि विशेष म्हणजे गोष्ट डिलिव्हरीचे अधिक पैसे आहेत. सोनू सूदचे सुपरमार्केट एक दम हिट आहे बॉस.’
हा मजेशीर व्हिडिओ शेअर करताना सोनू सूदने कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, ‘होम डिलिव्हरी फ्री आहे आणि १० अंड्यांसोबत एक ब्रेड देखील फ्री आहे.’ सोनू सूदच्या या मजेशीर व्हिडिओवर चाहत्यांसोबत अनेक सेलिब्रिटींनी देखील खूप मजेशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत.