हवा पर्यावरण दिन … दररोज !

पर्यावरणाचा ताल आणि तोल जर कुणी सांभाळत असेल तर त्या वनस्पती. आजच्या घडीला आपण सावलीच्या शोधात असतो ;पण या वृक्षवल्लीचे महत्त्व जाणून घेत आपण त्यांना साथ दिली व मनापासून झाडे लावली तर पर्यावरणाचे चित्र बादलू शकते वृक्षवल्ली कोणताही भेदभाव न ठेवता सज्जनांना आणि दुर्जनांना सारख्याच भावनेने साळली , फळे , फुले देतात. झाडाची तोड करणा-या लाकूडतोड्याच्या हातात मरता मरता दोन पैसे ठेवून जीव सोडतात. जिवंतपणी आणि प्राण गेल्यानंतरही मानवाची सेवा करणा- या वृक्षांचे जीवन सुखकर असते काय? खरंतर त्यांनाही जिवंत राहण्यासाठी परिस्थितीशी सारखे झगडावे लागते.काहीवेळा वनस्पती एकमेकांशी सहकार्य करून आपले अस्तित्व टिकवतात.

भारताचे थोर शास्त्रज्ञ जगदिशचंद्र बोस यांनी तर वनस्पतींना मानवाप्रमाणेच भावना असतात हे निर्विवादपणे सिद्ध केलं. ऊष्णतेने फळे , फुले , कोमेजतात यावरून त्यांना स्पर्श कळतो हे समजते. वारा , आग आणि वीज यांच्या तडाख्यात त्या झडून जातात. म्हणजे त्यांना आवाज समजतो. वृक्षांना वेली वेढा घालतात हे त्यांना दृष्टी असल्याशिवाय शक्य नाही. धूपाने वनस्पतीचे आजार बरे होतात म्हणजे तिला नाक आहे. तिला वास येतो.कमळ आपल्या देठाने पाणी ओढून घेते म्हणजे वनस्पतींना तोंड आहे. त्यांना सुखदुःखही समजते. छाटल्यावर पुन्हा वाढतात. निसर्ग समृद्ध आहे . मानवी जीवन समर्थ वैभवशाली व सौंदर्यशाली बनवण्यात तो मदत करतो.माणूस निसर्गावर विजय मिळवू पाहतो आहे. त्यामुळे क्रूद्ध झालेला निसर्ग मानवी जीवन उ द्ध्वस्त करतानाही दिसून येतो.
कोरोनाच्या काळात आॕक्सिजनचा पुरवठा कमी झाला हे त्याचेच उदा. आहे. प्रत्येक व्यक्तीने पर्यावरणाची जबाबदारी घेतलि पाहिजे.त्याचे चांगले परिणामही ‘ याचि देही याची डोळा ‘ पाहू शकतो.अन्न ,कागद , वीज पाणी इंधन याचा काटकसरीने वापर केला पाहिजे. घरात निर्माण होणारा कचरा ओला व सुका कचरा असं वर्गिकरण केलं पाहिजे.

स्वयंपाकघरात ही आपण पर्यावरणा संवर्धन करू शकतो. उदा. भांडे गॕसवर ठेवण्याआधी (भाज्या चिरणे , धान्य , डाळी धुणे इ.) तयारी करून ठेवणे , पदार्थ शिजवताना भांड्यावर झाकण ठेवणे, प्रेशर कुकरचा वापर करणे, कुकरची शिटी झाल्यावर गॕस बारीक करावा. इ. अनेक गोष्टी आहेत ज्यामुळे इंधन , उर्जा व मनुष्यबळ इ. ची बचत होईल. आता प्रचंड वृक्षतोड केल्यामुळे पाववसाचे प्रमाण कमी झाले. सर्व प्रकारची प्रदुषणंं झाली आहेत. याला माणूसच जबाबदार आहे.कोणत्याही सणाच्या निमित्ताने होणारी वृक्षतोड , फुले , पाने , फांद्या यांचा संहार तात्काळ थांबवला पाहिजे.

पर्यावरणाचे संवर्धन आपण केले पाहिजे. झाडाफुलांची एक सुप्त ओढ आपल्या सगळ्यांच्याच मनात असते. झाडिवर स्वच्छंदपणे विहार करणारे बहुरंगी पक्षी पावसाळ्यानंतर फुलणारी वन्य फुले , असे निसर्गसौंदर्य आपल्याला आनंद देतात. घरातील कोळ्याच्या जाळ्यात अनेख किटक अडकतात. ते योगायोगाने नव्हे त्यात परमेश्वराची योजना आहे. स्वयंपाकघरात एखादा गोड पदार्थ पडला असेल तर सैनिकी शिस्तीत असलेल्या मुंग्यांची रांगा पहा. कपाटात बिनदिक्कतपणे फिरणारे झुरळ , पुस्तकाची पाने खाणारी कसर इ. ठळक उदाहरणे हेच आपले पर्यावरण आहे. हि यादी फार मोठी आहे. हे सर्व घटक माणसांच्या फायद्याचेच आहेत. माणसांच्या हस्तक्षेपामुळे हि व्यवस्था बिघडते. ती पूर्ववत करण्याचा प्रयत्न माणूसच करू शकतो. माणसाने आत्मपरिक्षण करून दूरदृष्टी ठेवून प्रत्येकाने कमीतकमी एक झाड लावून त्याचे संवर्धन करणे गरजेचे आहे. सर्व प्राण्यांचा वनस्पती हा मूलाधार आहे. अन्न , वस्त्र व निवारा , औषधं यासाठी झाडच उपयोगी पडतात. झाडांमुळे आॕक्सिजन मिळतो. प्रत्येक झाड माणसासाठी कल्पवृक्ष आहे.
” जीवो जीवस्य जीवनम्” निसर्गामध्ये एक जीव दुस-या जीवावर अवलंबून असतो. एका वनस्पतीवर ३० ते ३५ इतर वनस्पती व प्राणी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे अवलंबून असतात.

निसर्गातील जैविक विविधता जतन केली पाहिजे. गरूड सापाला खातो . साप उंदराला खातो. उंदीर धान्य खातो. निसर्गातील ही अन्नसाखळी एकमेकांशी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे जोडलेली असते. म्हणूनच प्रत्येक जीव निसर्गातील संतुलन राखतो. निसर्गातील अनेक अन्नसाखळ्य एकमेकांशी जोडल्या गेल्या कि त्यांची जाळी तयार होते. निसर्गसृष्टीतील वनस्पती त्यांच्यातील हरितद्रव्याच्या साहाय्याने अन्न तयार करतात. वनस्पतीवर शाकाहारी प्राणी गुजराण करताथा. शाकाहारी प्राण्यांवर मांसाहारी प्राणी जगतात. माणूस मिश्रहारी सुद्धा आहे. ही अन्नसाखळी टिकून राहिली तर चक्र चांगलं चालते.
वनस्पती वरदानच आहेत त्यांचं रक्षण करून पर्यावरण संवर्धन रोजच्या माणसाच्या वर्तनातून दिसल पाहिजे.

घरातला ओला कचरा सुका कचरा आणि प्लॕस्टिक वेगळं ठेवलं पाहिजे. . इ कच-याची योग्य विल्हेवाट लावली पाहिजे. स्वायंपाकघरातील भाज्या धुतलेलं पाणी झाडाःना घालू शकतो. पाण्याचा , उर्जेचा जपून वापर केला तर दैनंदिन जीवन नक्कीच सुखकर होईल. यात शंका नाही.पर्यावरण दिन रोजच पाळता आला तर आपली वसुंधरा सुजलाम् सुफलाम होईल. वृक्ष , प्राणी ,पशू पक्षी व सर्व जीव यांना चराचरात मुक्त संचार करता आला पाहिजे. माणसाने पर्यावरणाच्या बाबतीत नायक बनून खलनायकाची वृतूती सोडून देऊन निसर्गाशी सुखसंवाद करीत आपले जीवन उन्नत करायचे आहे.

” जगा आणि जगू द्या ” या न्यायाने आचरण ठेवले पाहिजे.
“सा-या कोवळ्या जीवांना मायेचा स्पर्श व्हावा,
उजेडाचे दान देण्या झोपडीत सूर्य यावा,
नको असा एक हात जो रोपट्यास पारखा,
पानासही स्पर्श व्हावा
त्याच्या आईसारखा..

लेखिका – डाॕ. अंजुषा पाटील ठाणे.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.