अभिनेता फरहान अख्तर चा ‘तुफान’ चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात तो एका बॉक्सरच्या भूमिकेत दिसणार असून त्याचा संघर्ष दाखवण्यात येणार आहे. या चित्रपटात फरहान अख्तर, मृणाल ठाकुर, परेश रावल हे कलाकार मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.
भारत आणि जगभरातील २४० हून अधिक देशातील चाहत्यांना ‘तुफान’ हा चित्रपट १६ जुलै रोजी अॕमेझॉन प्राइम या ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहाता येणार आहे. ‘भाग मिल्खा भाग’ या चित्रपटाच्या यशानंतर फरहान अख्तर आणि राकेश ओमप्रकाश मेहरा ही दमदार जोडी ‘तुफान’च्या माध्यमातून पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
मुंबईतील डोंगरी भागात मोठा होऊन स्थानिक गुंड झालेल्या अज्जू या अनाथ मुलाची. अनन्या या हुशार, प्रेमळ मुलीला भेटल्यानंतर त्याचे आयुष्य बदलून जाते. अनन्याचा त्याच्यावर विश्वास आहे आणि त्यामुळेच त्याला स्वत:ची वेगळी ओळख शोधण्याची जिद्द लाभते. यातूनच अजीज अली हा बॉक्सिंग चॅम्पियन तयार होण्याचा प्रवास सुरु होतो. अशी ‘तुफान’ ही प्रेरणादायी कथा आहे.