यंदा चार वेळा ग्रहण पाहण्याची संधी मिळणार आहे. या वर्षी एकूण चार ग्रहणे लागतील. त्यातील दोन सूर्यग्रहण आणि दोन चंद्रग्रहणे असणार आहेत. त्यातील पहिले चंद्रगहण २५ मे रोजी लागणार आहे. हे चंद्रग्रहण खग्रास चंद्रग्रहण असणार आहे. २६ मे म्हणजे बुधवारी वैशाख पौर्णिमेला दिसणार आहे. या ग्रहणाचे खास वैशिष्ट्ये म्हणजे हे ग्रहण संपूर्ण चंद्रात दिसणार नाही, कारण जेव्हा ग्रहण सुरु होईल तेव्हा भारतात दिवस असेल. त्यामुळे काही भागात ग्रस्तोदयाच्या रुपात पाहिले जाऊ शकते. ग्रहणाचे सूतक संपूर्ण देशात असणार नाही. ज्या ठिकणी ग्रहण दिसेल तिथेच सूतक असले.
हे खग्रास चंद्रग्रहण इम्फालमध्ये २५ मिनिटे तर कोलकत्तामध्ये केवळ सहा मिनिटे दिसणार आहे. संपूर्ण भारतात वायव्य दक्षिण आणि बिहार राज्यात संध्याकाळी ६:२१ रोजी चंद्रोदय होईल. भारतीय ज्योतिष विज्ञान परिषदेते सचिव आचार्य कौशल वत्स यांनी असे म्हटले आहे की, मेरठ हे ग्रहणांच्या परिणामांपासून दूर राहिल. धर्मग्रंथानुसार, चंद्रग्रहणाचा ग्रहण प्रारंभ होण्याच्या वेळेच्या नऊ तास आधी सुरु होतो. त्यामुळे सकाळी ६:१५ पासून चंद्रग्रहणाचा प्रभाव असलेल्या भागात सूतक लागते,असे त्यांनी सांगितले.
या वर्षांतील चार ग्रहणे कोणती?
या वर्षांतील पहिले सूर्यग्रहण १० जून दिसणार आहे. तर दुसरे सूर्यग्रहण हे ४ डिसेंबर रोजी दिसणार आहे. त्याचप्रमाणे पहिले चंद्रग्रहण हे २६ मे रोजी दिसणार आहे आणि दुसरे चंद्रग्रहण १९ नोव्हेंबर रोजी असणार आहे. अशाप्रकारे या वर्षी चार ग्रहणे असणार आहेत.