उन्हाळा, पावसाळा, होते हिवाळा कोणताही ऋतू असला तरी अनेकजण ओठांच्या समस्या असतात. अनेकांना ओठ फुटण्याचीही समस्या असते. काहींचे ओठ कोरडे असतात. त्यामुळे ओठांची काळजी कशा प्रकारे घ्यायला हवी हे आपण पाहूया.
-रात्री झोपताना शेंगदाण्याच्या तेलानं ओठावर मसाज करून नंतर सुती कपड्यानं पुसून घ्या. ओठ नरम होण्यास याची खूप मदत होते.
-सकाळी आणि रात्री दात घासताना ब्रश ओठांवरून अलगद फिरवावा. त्यामुळं ओठांवरील मृत त्वचा निघून जाते.
-ओठ दातानं कुरतडण्याची सवय टाळा. या सवयीमुळं ओठांच्या त्वचेचं नुकसान होत असतं. ओठांचे पापुद्रे निघतात, भेगा पडतात, त्वचा खचली गेल्यानं त्यातून रक्त येतं, त्यामुळं ओठ राठ पडतात.
-रात्री झोपताना व्हॅसलिन आणि लिंबाचा रस एकत्र करून ओठांना लावा त्यामुळं ओठांचा कोरडेपणा दूर होतो.