बडोदा | ९१ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन गुजरात येथील बडोदा याठिकाणी होणार आहे. या संमेलनाच्या अध्यक्षपदी निवृत्त आय. ए. एस. अधिकारी, लेखक, कादंबरीकार, कथाकार लक्ष्मीकांत देशमुख यांची निवड झाली आहे. यंदाच्या संमेलन निवडणुकीत कादंबरीकार रवींद्र शोभणे विरुद्ध देशमुखांनी ७० मंतानी विजय मिळवला.
इन्कलाब विरुद्ध जिहाद या विषयावर लक्ष्मीकात देशमुख यांनी कांदबरी लिहिली आहे. त्यांच्या आजवरच्या कारकीर्दीत त्यांनी १३ पुस्तके प्रकाशित केली आहेत.