चेहरा तजेलदार दिसण्यासाठी विविध प्रकारच्या शस्त्रक्रिया या चेहऱ्यावर करून घेतल्या जात असतात. परिणामी त्या शस्त्रक्रियामुळे काही समस्यांनाही सामोरे जावे लागत असते.काही महत्वाच्या गोष्टींकडे लक्ष दिल्यास संपूर्ण शरीर निरोगी राहू शकते. आरोग्यासाठी दररोज थोडासा वेळ काढणे देखील महत्वाचे आहे. त्वचेला निरोगी ठेवण्यासाठी आहारात केलेले थोडेसे बदल करावेत. युनिव्हर्सिटी ऑफ सेंट एंड्रेजच्या एका संशोधनानुसार चकाकत्या रंगाची फळे आणि भाज्या जसे सफरचंद, पपई, टोमॅटो, सिमला मिरची खाल्ल्यास त्वचा निरोगी राहते.
आहारात पुढील गोष्टीचा समावेश करावा :-
1) दररोज दोन सफरचंदाचा ज्यूस पिल्याने मेंदू तल्लख राहतो. सफरचंदाच्या रसाने मेंदूला नवी ऊर्जा मिळते. त्याचप्रमाणे तो चांगल्या प्रमाणे काम करतो.
2) डोळ्यांची क्षमता वाढवण्यासाठी व्हिटॅमिन सी युक्त पदार्थ खाणे एक चांगला पर्याय आहे. लिंबू, संत्रा, मोसंबी सारखी आंबट फळे वरचेवर खाल्ल्यास डोळ्यांची क्षमता वाढते.
3) दररोज दोन कप ग्रीन टी पिल्यास दातांचा पिवळेपणा, कॅविटी आणि दात सडणे अशा समस्या होत नाहीत.
4) दररोज लिंबू सरबत मध टाकून पिण्यामुळे हि त्वचेला तजेला मिळत असतो.