दिनांक 21 जून 2019 रोजी रांची येथे आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने, भारत सरकारच्या AYUSH मंत्रालयाने 2019 या सालासाठी ‘योग याचा प्रसार आणि विकास करण्यासाठी दिलेल्या उत्कृष्ट योगदानाबद्दल पंतप्रधान पुरस्कार’ या पुरस्काराच्या विजेत्यांची नावे जाहीर केली.
विजेते –
– वैयक्तिक (राष्ट्रीय) श्रेणी – लाइफ मिशन या संस्थेचे स्वामी राजर्षी मुनी (गुजरात)
– वैयक्तिक (आंतरराष्ट्रीय) श्रेणी – इटलीच्या अँटोनिटा रोझी संघटना
– राष्ट्रीय श्रेणी – बिहार स्कूल ऑफ योग, मुंगेरसंघटना
– आंतरराष्ट्रीय श्रेणी – जपान योग निकेतन, जपान
पुरस्काराविषयी
दिनांक 21 जून 2016 रोजी द्वितीय आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने चंदीगड येथे झालेल्या एका कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘योग याचा प्रसार आणि विकास करण्यासाठी दिलेल्या उत्कृष्ट योगदानाबद्दल पंतप्रधान पुरस्कार’ जाहीर केला होता. हा पुरस्कार भारत सरकारच्या आयुर्वेद, योग व निसर्गोपचार, युनानी, सिद्ध आणि होमिओपॅथी (AYUSH) मंत्रालयाच्यावतीने दिला जातो. विजेत्यांची निवड मंत्रालय एका समितीद्वारे करतो. विजेत्याला पुरस्काराच्या स्वरुपात एक सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र आणि 25 लक्ष रुपये रोख रक्कम दिली जाते.