सकाळी लवकर उठणे आरोग्यासाठी चांगले असते. लहान असताना आपल्या झोपायच्या वेळा आणि उठायच्या वेळा ठरलेल्या असतात, मात्र मोठं झाल्यावर आपल्या धावपळीच्या जीवनात आपल्या झोपायच्या व उठायच्या वेळा ठरलेल्या नसतात. पण रात्री लवकर झोपणे आणि लवकर उठणे शरीरासाठी उत्तमचं. लवकर उठल्याने आपले शरीर निरोगी राहते.
सकाळी लवकर उठून चालण्याचे अनेक फायदे आहेत. कोवळ्या उन्हात किमान चालण्याने ३० ते ४० मिनिटे चालण्याने आपल्या शरीरातील साखरेचे प्रमाण नियंत्रित राहते. चालण्याचा बऱ्याच जणांना कंटाळा येतो. चालण्याशिवाय जर सायकल चालवली तर त्याचे देखील आपल्या शरीराला बरेच फायदे आहेत. सायकल चालवण्याने आपल्या हृदयाची गती वाढेते त्याच बरोबर स्नायू मजबूत होतात आणि हृदयाचा धोका देखील कमी होतो.
उत्तम आरोग्यासाठी कमीतकमी ८ तास झोप आवश्यक आहे. झोप पूर्ण घेतल्याने लठ्ठपणा व इतर आजार होत नाही. झोप पूर्ण न झाल्याने दिवसभर अस्वसथ वाटणे डोके दुखणे चिडचिड होणे यांसारख्या समस्या होतात. कोरोनाच्या काळात बाहेर जाता येत नसल्याने आपण घरी राहून योग करू शकतो त्याने देखील शरीर सुदृढ राहते. पुरेशी झोप आणि व्यायामासोबत शरीरात ४ ते ५ लिटर पाणी पिणे आवश्यक आहे. पाणी शरीरासाठी फायदेशीर आहे.