मुंबई: महाराष्ट्राच्या विधान परिषदेत निवडून आलेल्या सहा नवनिर्वाचित आमदारांनी आज सभापती रामराजे पाटील निबांळकर यांच्या अध्यक्षतेखाली शपथविधी घेण्यात आली. तानाजी सावंत (यवतमाळ), अनिल भोसले (पुणे), अमरनाथ राजूरकर (नांदेड),मोहनराव कदम (सांगली-सातारा), चंदूभाई पटेल (जळगाव), आणि डाॅ.परीनय फुके (भंडारा) या सहा विधान परिषद सदस्यांनी शपथ घेतली.