रिपोर्ट: द वाॅईस आॅफ मुंबई
नागपूर: सुप्रसिद्ध गायिका आशा भोसले यांच्या लोणावळ्यालीत बंगल्याच्या वीजबिलाचा प्रश्न आज विधीमंडळात गाजला.त्यांच्या बंगल्याचा कमी वापर होवून देखील त्यांना ५० हजारांपेक्षा जास्त बील आलाय. यासंदर्भात भाजपाचे आमदार आशिष शेलार यांनी प्रश्न उपस्थित केला. याप्रकरणी चौकशी करुन योग्य कारवाई करु असे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले. यावर सामान्य जनतेच्या वीज बिलांवर सरकार दखल का घेत नाही असा सवाल समाजवादी पक्षाचे नेते अबू आजमी यांनी केला.