रिपोर्टर: राखी केणी
मुंबई:राष्ट्रवादीचे दोन दिग्गज नेते संजय दिना पाटील आणि नवाब मलिक या दोन्ही नेत्यांनी पक्ष हित पाहता आपापसातील वाद संपुष्टात आणले. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आ.सुनिल तटकरे व मुंबई अध्यक्ष सचिनभाऊ अहिर यांच्या समवेत दोन्ही नेत्यांनी एकमेकाशी हास्तांदोलन करत आगामी बृहन्मुंबई महानगर पालिका निवडणूक-२०१७ करिता सामोरे जाण्याचे वाण घेतले केले. त्यामुळे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना नवी उमेद मिळाली आहे.