नागपूर: गडचिरोली जिल्ह्यातील देसाईगंज येथील निवडणुकीत उमेदवाराला कप-बशी चिन्ह देण्यासाठी मंत्री जानकर यांनी दबाव टाकला होता. यावेळी सदर उमेदवाराची काँग्रेसची उमेदवारी रद्द करुन त्यांना कप-बशी हेच निवडणूक चिन्ह देण्यात यावे, बाकी आपण पाहून घेऊ अशा आशयाची व्हिडिओ क्लिप व्हायरल झाली होती. त्यामुळे दुग्धविकास मंत्री महादेव जानकर यांच्या अडचणीत वाढ झालीय. त्यासह त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलायं. महादेव जानकर यांनी आपल्यावरील गुन्हा मागे घेण्यासाठी नागपूर उच्च न्यायालयात धाव घेतली होती. मात्र न्यायालयानेही या प्रकरणात हस्तक्षेप करण्यास नकार दिला आहे. त्यामुळे जानकर यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.