मुंबई: ओला या खाजगी वाहन कंपनीने नुकतेच नवीन फिचर शेअर एक्प्रेस लाँच केले. या लाँचनंतर कंपनीने जाहीर केलेल्या एका पत्रकात म्हटले आहे “ओला ने आपल्या शेअर राईडच्या किमती ३० टक्क्यांपर्यंत कमी केल्या आहेत. यामुळे तुमचा रायडिंग अनुभव अधिक स्वस्त व सुखकर होईल.”खाजगी वाहन कंपनीने प्रवाशीसाठी ‘शेअर एक्सप्रेस’ हे फीचर ओला ने शहराच्या काही विशिष्ट मार्गांवर सुरू केले आहे. ज्या ग्राहकांचे पिक अप व ड्रॉप ऑफ लोकेशन सारखे आहे ते अॅपच्या शेअर आयकॉनवर जाऊन शेअर राईड बुक करू शकतात. येणाऱ्या काळात ओला १० शहरांच्या ३०० पेक्षा अधिक मार्गांवर शेअर एक्सप्रेस सेवेचा विस्तार करण्याची योजना बनवत आहे.