बीड: राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे ह्या पुन्हा वादाच्या भोव-यात अडकल्या आहेत. चिक्की घोटाळा, सेल्फी प्रकरण तसेच काही ना काही कारणाने चर्चेत असणाऱ्या पंकजा मुंडे यांनी पुन्हा एक वादग्रस्त विधान केलाय. “आमच्या लोकांना पैसा कसा खायचा हे कळत नाही, कोणत्याही कागदावर सही करतात”. असे वक्तव्य राज्याच्या महिला व बाल विकास मंत्री पंकजा मुंडे यांनी केलाय. बीडमधील एका सभेत त्यांनी हे वत्कव्य केले. मुंडेंच्या या वक्तव्यामुळे त्या अडचणीत येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.