मुंबई: अभिनेते शरद पोंक्षे यांचा बहुचर्चित नाटक ‘हे राम नथुराम’ कोल्हापूरनंतर आता कोकणातही या नाटकाला विरोधाचा सूर अधिक वाढलाय. हे राम नथुराम नाटकाचे प्रयोग कोकणात होऊ देणार नाही. प्रयोग कराल तर याद राखा अशी धमकी स्वाभिमान संघटनेचे अध्यक्ष नितेश राणे यांनी दिलीय. असा आरोप शरद पोंक्षे यांनी केलाय. कणकवली, कुडाळ, मालवण या ठिकाणची टिकीट विक्री थांबवली आहे. यासंदर्भात पोलीस संरक्षण घेऊन नाटकांचे प्रयोग करणार असल्याचे पोंक्षे यांनी सांगितले आहे.