मुंबई: मुंबई महानगरपालिकेच्या तोंडावर शिवसेना आणि मित्रपक्ष भाजपात चांगलेच तोंडवार होतांना दिसतंय. एकीकडे युती संदर्भात निर्णय घेण्यासाठी त्रिसदस्यीय कमिटी नेमली असताना, दोन्ही पक्षाच्या नेत्यांकडून एकमेकांवर वार-पलटवार करणं सुरुच आहे. विधानसभा निवडणुकीत ५० टक्क्यांपेक्षा जास्त वॉर्डात भाजपला बहुमत मिळालं होतं, याचं भान शिवसेनेला आहे का असा सवाल किरीट सोमय्यां यांनी केलायं.