मुंबई: हिंदी चित्रपट सृष्टीतील अनेक कलाकारांचे मैत्री आपल्याला ठाऊकच आहेत.मात्र बॉलिवूडमधल्या एका मैत्रीत कायमचं खंड पडलाय. दिग्दर्शक जोहर आणि अभिनेत्री काॅजोल यांची २५ वर्षांची मैत्री संपली आहे. करणनंच त्याच्या आत्मचरीत्र ‘द अनसुटेबल बॉय’ या पुस्तकात यासंदर्भातला खुलासा केलाय. ह्या दिवाळीला चित्रपट वॉर झाला होता. आता दोन महिन्यांनंतर पुन्हा नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. कारण करण जौहरने अजुन एक धमाका केला आहे. द अनसुटेबल बॉय’ या त्याच्या आत्मचरित्रात करण काजोलसोबतच्या नात्यावर बोलला आहे.आमच्यात आता मैत्री उरली नाही सगळं संपलं आहे. काजोल माझ्या आयुष्यात आता पुन्हा कधीच येऊ शकत नाही. कदाचित तिलाही तेच हवं आहे. मी काजोल आणि अजय बरोबर आता कुठलेच संबंध ठेऊ इच्छीत नाही. २५ वर्षांपासून असलेली आमची मैत्री आता संपली आहे, असं निर्माता-दिग्दर्शक करण जोहर यांनी सांगितले आहे.