औरंगाबाद: काळ्या पैशाला लगाम लावण्यासाठी मोदी सरकारने घेतलेला नोटबंदीचा निर्णय योग्यच आहे. मात्र नियोजन चुकल्याने याचा त्रास सामान्य जनतेला होत आहे असे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार म्हणालेत. या निर्णयामुळे सगळ्यात मोठा फटका हा सहकार चळवळीला बसल्याचा आरोपही पवारांनी केला आहे. यावर सरकारनं लवकरात लवकर तोडगा काढावा अशी मागणीही त्यांनी केली आहे. ते औरंगाबाद येथील सभेत बोलत होते.