लखनऊ: देशातील सर्वात मोठया राज्यात निवडणुकीचे बिगुल वाजलय. समाजवादी पार्टीने उत्तरप्रदेश निवडणूकांसाठी आपला जाहीरनामा घोषीत केलाय. मुलायमसिंह यादव यांच्या गैरहजेरीत अखिलेश यादव यानी पार्टीचे घोषणापत्र जाहीर केले. प्राथमिक शिक्षण घेणा-या मुलांना एक किलो तुप, कुपोषित मुलाना एक किलो दुध, पावडरचे डब्बे देण्यात येतील असं या घोषणापत्रामध्ये सांगण्यात आलं आहे. त्याचबरोबर महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना लॅपटॉप आणि स्मार्ट फोन, नोकरदार महिलांना वसतिगृह, बस प्रवासात पन्नास टक्के सवलत, गरिब महिलांना कुकर आणि अत्यंत गरिब असणाऱ्यांना फ्रीमध्ये गहू आणि तांदूळ, एक कोटी नागरिकांना महिन्याला एक हजार रुपये पेन्शन अश्या अनेक घोषणा या जाहीरनाम्यात करण्यात आल्या आहे.