मुंबई: शाहरुख खानचा रईस हा चित्रपट येत्या २५ जानेवारीला रिलीज होणार आहे. मात्र यापूर्वीच रईस अडचणीत येण्याची शक्यता आहे. रईस फिल्म ज्या गुजरातच्या माफिया डॉनवर आधारित आहे त्या अब्दूल लतीफवर २०१४ मध्ये चित्रपट रिलीज केल्याचा दावा रिनू केवल सेठ या निर्मात्यांनी केला आहे. यासंदर्भात त्यांनी मुंबई येथील दिंडोशी कोर्टात शाहरुख खानच्या रेड चिली कंपनीच्या विरोधात दावा दाखल केलाय. त्यामुळे शाहरुख खान अडचणीत आलाय.