मुंबई: मुंबई विद्यापीठाने एक ऐतिहासिक निर्णय घेतलाय. यानंतर सर्वच उत्तरत्रिका ऑनलाईनच तपासल्या जाणार असल्याची महत्त्वपूर्ण घोषणा मुंबई विद्यापीठानं केली आहे. मुंबई विद्यापीठाचे कुलगुरु डाॅ. संजय देशमुख यांनी यासंदर्भात घोषणा केली आहे. येणा-या एप्रिल महिन्यापासून त्याची अंमलबजावणी होणार असल्याची माहिती कुलगुरु देशमुख यांनी दिली आहे.