पणजी : गोव्यात ४ फेब्रुवारीला होणाऱ्या विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा पार पडली. या प्रचारसभेत मोदींनी काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला. काँग्रेसच्या भ्रष्टाचाराचा यावेळी मोदींनी पुराण वाचले. देशात गोवा हे छोट्या राज्यातील सगळ्यात चमकदार राज्य असून मोठ्या राज्यांपुढे शिकण्यासाठी प्रेरीत केले आहे असं मोदी म्हणालेत. गोव्यात भाजपची सत्ता दिल्यास गोव्याला देशातील सर्वोत्तम राज्य बनवू असे आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिले.