नाशिक: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केलेला नाशिकचा विकास पाहण्यासाठी टाटा उद्योग समूहाचे डायरेक्टर रतन टाटा नाशिकमध्ये आले आहेत. नाशिकच्या बॉटॅनिकल गार्डनमध्ये टाटांनी पाहाणी दौरा केला. मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे या दौऱ्यासाठी जातीने उपस्थित होते. नाशिक महापालिकेच्या तिजोरीवर भार न टाकता टाटा समूहाने या विकास कामांसाठी भरीव मदत केली आहे.