सोलापूर: गेली दोन दिवस चर्चा बैठक घेऊन सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसमध्ये आघाडी होऊ शकली नाही. त्यामुळे हे दोन्ही पक्ष आता सोलापूर महानगरपालिकेच्या रणांगणात एकमेकांसमोर उभे असल्याचे निश्चित झाले आहे. या दोन्ही पक्षांनी स्वतंत्र निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे. काँग्रेस पक्षाच्या वतीने ८१ उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने पक्ष निरीक्षक प्रदीप गराटकर यांनी ३३ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे.