मुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या रणधुमाळीत सर्वच पक्षांमध्ये टिकीट मिळविण्यासाठी मोठी कसरतच करावी लागतीये. घाटकोपरच्या राष्ट्रवादीच्या नगरसेविका प्रतीक्षा घुगे यांनी मात्र पक्षांतराचा वेगळाच विश्वविक्रम निर्माण केलायं. काही महिन्यांपासून त्या भाजपचं काम करत होत्या. मात्र भाजपनं घाटकोपरच्या प्रभाग १२० मधून त्यांना उमेदवारी नाकारली असल्यामुळे त्यांनी शिवसेनेचा दार ठोठावले. शिवसेनेनं त्यांना उमेदवारी दिली. मात्र एबी फॉर्ममध्ये तांत्रिक अडचण असल्याचं सांगत फॉर्म काढून घेतला. त्यामुळं प्रतीक्षा घुगे ह्या अस्वस्थ झाल्या. मात्र त्या झगमगल्या नाहीत, शेवटी त्यांना अखेरच्या क्षणी काँग्रेसनं उमेदवारीचा हात दिला. त्यामुळे एकाच दिवसात त्यांनी तीन पक्षात प्रवेश घेतला आणि आणि पक्षांतर केलायं.