नवी दिल्ली: माजी केंद्रीय रेल्वेमंत्री लालू प्रसाद यादव यांच्या मालमत्तांवर सीबीआयने छापे टाकले आहे. लालू प्रसाद यादव यांच्याबरोबर पत्नी राबडी देवी, मुले आणि इतरांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. लालू प्रसाद यादव २००६ साली रेल्वेमंत्री असतांना रांची आणि पुरीमधल्या हॉटेल्सना निविदा देताना केलेल्या घोटाळ्यांच्या आरोपानंतर छापे टाकण्यात आले आहे. दिल्ली, रांची, पुरी, पाटना, गुरुग्राम यासारख्या १२ ठिकाणी सीबीआयने छापे टाकले आहेत.