अहमदनगर: कान्हूर पठार येथील मंतिमंद मुलांच्या शाळेत कृषीदिनाचे औचित्य साधून वृक्षारोपण आणि मंतिमंद मुलांना खाऊ वाटपाचा कार्यक्रम राबविण्यात आला. याप्रसंगी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता अजयकुमार सर्वगोड यांची उपस्थिती लाभली. त्यांनी सामाजिक बांधिलकी जपत मतिमंद मुलांना कपडे, तांदुळ, गहू, आणि इतर जीवनाश्यक वस्तू भेट दिल्या. संस्थेचे अध्यक्ष कांतीलाल साळवे, डि. एस. ठुबे, शाहुराव औटी, बाळासाहेब तराळ, सुरेश नवले, ज्योती ठुबे व इकबाल इनामदार कार्यक्रम स्थळी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक माजी जि. प. सदस्य अॅड. आझाद ठुबे, सूत्रसंचालन सरपंच गोकुळ काकडे यांनी केले, तर संस्थेचे सचिव तुषार ठुबे यांनी आभार मानले.
रवी खरात, प्रतिनिधी