मुंबई: रेल्वे स्टेशनच्यानंतर आता मुंबईतील मेट्रोच्या स्टेशनवरही एक रूपयांत आरोग्य सुविधा मिळणार आहे. ‘वन रूपी क्लिनिक’ ही सेवा १५ ऑगस्टपासून घाटकोपर ते वर्सोवा मेट्रो मार्गावरील पाच स्टेशनवर सुरू केली जाणार आहे. मुंबईकरांच्या पसंतीला उतरलेली ‘वन रूपी क्लिनिक’ मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावरच्या पाच स्थानकांवर उपलब्ध आहे. एक रूपयांत आरोग्य सुविधा तर मिळतेच शिवाय अत्यंत कमी किंमतीत रक्त चाचणी, एमआरआय, स्कँन, एक्सरे अशा विविध चाचण्याही याठिकाणी केल्या जातात.