मुंबई: मुंबई विद्यापीठाचे तृतीय वर्षे अभ्यासक्रमाचे जवळजवळ सर्वच निकाल प्रलंबित आहेत. त्यामुळे पदव्युत्तर शिक्षण घेण्यासाठी इच्छूक असलेल्या विद्यार्थ्यांचे भविष्य अंधारात आहे. बी. फार्मसी तृतीय वर्ष विद्यार्थ्यांचे निकाल देखील प्रलंबित असल्याकारणाने देशातील नामांकित संशोधन संस्थेत त्यांना प्रवेश घेता येणार नाही. १७ जुलैला त्यांच्या प्रवेश प्रक्रियेची शेवटची तारीख आहे. विद्यापीठाने निकाल जाहीर न केल्यास विद्यार्थ्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान होणार आहे. छात्रभारतीने या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेतली असून बी. फार्मसीच्या २०० विद्यार्थ्यांसोबत आज संध्याकाळी मुंबई विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. संजय देशमुख यांच्या कलिना कॅम्पस येथील निवासस्थानी ठिय्या आंदोलन केली व रात्री विद्यापीठाची दरवाजे उघडली गेली स्वत: कुलगूरू रात्री ठिक १० वाजता आंदोलकांचे भेट घेऊन १६ तारखेच्या आत निकाल लावण्याची आश्वासन दिले. या मिटींगला जेडीयू अध्यक्ष आमदार कपिल पाटील उपस्थित होते याचे नेतृत्व छात्रभारतीचे मुंबई अध्यक्ष सचिन बनसोडे, मुंबई विद्यापीठ रोहित ढाले व मुंबई युवती संघटीका अमरीन मोगर याच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले.