मुंबई: शेतकरी कर्जमाफीवरुन अख्या महाराष्ट्रात रान पेटले होते. सलग अकरा दिवस चाललेल्या या आंदोलनालाचआंदोलनाला पूर्ण विराम देवून मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनी तात्विक पद्धतीने कर्जमाफी केली आहे. मात्र या कर्जमाफीचा ठराविक शेतक-यांना फायदा झाला आहे. असे काँग्रेस पक्षाने म्हणणे आहे राज्यातील लाखो शेतकरी कर्जमाफीपासून वंचित राहिले आहे. यासंदर्भात काँग्रेस पक्ष राज्यात सरकारविरोधात आजपासून राज्यभर अभियान छेडणार आहे. कर्जमाफी न झालेल्या शेतकऱ्यांसाठी काँग्रेस हे अभियान राबवणार आहे. या अभियानाची सुरुवात विदर्भातील बुलढाणा जिल्ह्यातून होणार आहे. ‘माझी कर्जमाफी झाली नाही’ असं या अभियानाचं नाव आहे. ज्या जिल्ह्यांमध्ये कर्जमाफी झालेली नाही त्या जिल्ह्यातल्या शेतक-यांकडून अर्ज भरून घेतले जाणार आहेत. या पावसाळी अधिवेशनात हे अर्ज सरकारसमोर सादर केले जाणार आहेत. त्यामुळे या पावसाळी अधिवेशनात कर्जमाफीचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर येणार हे मात्र निश्चित आहे.