मुंबई : कोपर्डी, हनुमंतखेडासह महाराष्ट्रातील अल्पवयीन मुलींवर झालेल्या बलात्कार, हत्याकांड विरुद्ध दादर स्थानकावर जनआंदोलन करण्यात आले. संबंधित दोषींवर कारवाई करुन त्याना तात्काळ फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी सकल बंजारा समाजाने केली आहे. यासंदर्भात राज्यपाल यांना निवेदन देण्यात आले. “जोपर्यंत शासन कठोर कायदा अंमलात आणत नाही तोपर्यंत अश्याप्रकारच्या कृत्याला आळा बसणार नाही. बलात्कार करणा-या नराधमांना फाशीची शिक्षा दिली पाहिजे” असे सामाजिक कार्यकर्ते संदीप चव्हाण म्हणाले याप्रसंगी अॅड नरेश राठोड, उल्हास राठोड राजेश चव्हाण, गोविंद राठोड, बाळू जाधव उपस्थित होते.