मुंबई: मुंबई विद्यापीठाच्या भोंगळ कारभाराच्या विरोधात व रखडलेल्या विद्यापीठाच्या निकालाबद्दल तसेच विविध कारणाने विद्यापीठ रोज चर्चेत आहे. या अनागोंदी कारभाराविरोधात छात्रभारती आणि बुक्टो प्राध्यापक संघटनेने कुलगुरुंविरोधात फोर्ट कैंपस येथे निदर्शने केली. कुलगुरुंच्या मनमानी कारभाराचा निषेध करत, लवकरात लवकर लांबलेले निकाल जाहीर करावे व विद्यार्थ्यांचे होणारे नुकसान टाळावे अशी मागणी करण्यात आली. छात्रभारतीच्या वतीने युवती संघटिका अमरीन मोगर आणि अध्यक्ष सचिन बनसोडे यांनी आपली भूमिका मांडली.