मुंबई | विरार शहरात भरदिवसा सर्रास चो-या होत आहेत. त्यामुळे स्थानिक नागरिकांत अस्थिरता निर्माण झालीय. आज चोरट्यांनी दोन ठिकाणी घरफोड्या केल्या, यात त्यानी सोने- चांदी व रोकड पैसे जवळ -जवळ ४ लाखांचे ऐवज लंपास केले. फुलपाडा येथील गांधी चौकातील सिद्धीविनायक इमारतीत राहणा-या विनोद जग्गननाथ चव्हाण यांच्या राहत्या घरी चोरट्यांनी चोरी केली. दरम्यान, चव्हाण सहकुटुंब बाहेर गेले असता हा संबंध प्रकार घडलाय. याप्रसंगी घराच्या मुख्य प्रवेशद्वाराचे कुलुप तोडून घरात चोरी झाल्याचे चव्हाण यांनी सांगितले आहे. तर दामोदर एनक्लेव या इमारतीत राहणा-या आत्माराम सिखी यांच्या घरी सुद्धा चोरट्यांनी चोरी केलीय. १० तोळे सोने व अर्धा किलो चांदी व १ लाख रुपये चोरुन नेले आहे.