कल्याण | कल्याण येथील पूर्व भागात वास्तव्यास राहणाऱ्या तरुणीला त्याच भागात राहणाऱ्या एका तरुणाने लग्नाचे खोटे आमिष दाखवून वारंवार शारिरीक शोषण केल्याचे समोर आले आहे. त्याचबरोबर पीडित तरुणीसोबत वेगवेगळ्या ठिकाणी नेवून धमकावून तिच्यावर जबरदस्तीने शारीरिक संबंध केले. दरम्यान, पीडित तरुणी व तिच्या कुटुंबियांनी काही महिन्यानंतर सम्राटला लग्नाबाबत विचारले असता, त्याने दमदाटी करत शिवीगाळ केली. याप्रसंगी तरुणीचे फसवणूक झाल्याचे समजल्यावर तिने कोळसेवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. यासंदर्भात पोलिसांनी सम्राट धनरावच्या विरोधात गुन्हा दाखल करुन पुढील चौकशी चालु केली आहे.