मुंबई | महाराष्ट्राची लोकवाहिनी समजली जाणारी गोरगरिबांपासून सर्वसामान्य जनतेच्या सेवेसाठी २४ तास तत्पर असणारी एसटी, तसेच महाराष्ट्र राज्याच्या विकासात सिंहाचा वाटा असलेल्या एसटी महामंडळावर राज्यसरकारकडून वारंवार होत असलेले दुर्लक्ष त्यामुळे एसटीचे राज्य शासनात विलिनीकरण झाले पाहिजे. आजपर्यत सर्वाच्या मदतीसाठी एस टी व एस टी कर्मचारी धावून गेलेली आहे. नुकताच एसटी महामंडळाकडून शेतकरी कर्जमाफीसाठी ५ कोटी रूपयाची मदत करण्यात आली आहे. परंतु एसटी महामंडळातील कर्मचाऱ्यांकडे लक्ष देण्यासाठी महामंडळ तसेच राज्यसरकार यांना वेळ नाही. वाढती महागाई लक्षात घेता एसटी कर्मचाऱ्यांचे तुंटपुंजे पगारामुळे घरातील दैनंदीन अडचणी, आजारपन,मुलांचे शिक्षण, एसटी कर्मचाऱ्यांच्या वाढत्या आत्महत्या ई. बाबींवर राज्यसरकारचे लक्ष वेधण्यासाठी व एसटी कर्मचाऱ्यांना शासकीय स्वयंरचने नुसार वेतन मिळावे, म्हणून महाराष्ट्रातील एसटी कर्मचारी पत्नीसह येत्या २ आॅगस्ट २०१७ रोजी आझाद मैदान मुंबई येथे उपोषणास बसणार आहेत. उपोषणास बसणार्या एसटीकर्मचारी पत्नीनी विशेषतः मुंबई, ठाणे, पालघर, रायगड तसेच महाराष्ट्रातील एसटीकर्मचारी पत्नी किंवा घरातील महिल सदस्य यांनी जास्तीत जास्त संख्येने उपोषणस्थळी यावे. असे आव्हान एसटीकर्मचारी पत्नी यांनी केलेले आहे.
प्रमुख मागण्या-
१) राज्यशासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे एसटी कर्मचाऱ्यांना सेवाजेष्ठतेनुसार पदनिहाय शासकीय वेतनश्रेणी देऊन एसटीचे राज्यशासनात विलीनीकरण करावे.
२) राज्यशासकीय कर्मचारी व एसटी कर्मचारी यांच्या वेतनातील तफावत दुर होणेसाठी राज्यशासकीय कर्मचाऱ्यांना सातवा वेतनआयोग लागू होईपर्यत एसटी कर्मचाऱ्यांना दरमहा सरसकट रू १५०००/- अंतरीमवाढ देण्यात यावी.